शिवाजी महाराज निबंध मराठी 2022 | Shivaji Maharaj Essay in Marathi PDF – Shivaji Maharaj Nibandh Marathi

shivaji maharaj nibandh in marathi

Shivaji jayanti 2022: छत्रपति शिवाजी भारत के सबसे महान भारतीय राजा व मराठा शान मराठा साम्राज्य के संस्थापक थे| वह बहुत ही निडर बुद्धिमान वह साहसी राजा थे जिन्होंने मुगलों के खिलाफ भारत की शान को बनाए रखा था| वह रामायण व महाभारत के अभ्यास को बड़े ध्यान से करते थे| छत्रपति शिवाजी की जयंती इस साल 19 फरवरी 2022को पूरे देश भर में वह महाराष्ट्र में खासकर बड़े ही उत्साह पूर्ण तरीके से मनाई जाएगी|

शिवाजी महाराज निबंध मराठी – shivaji maharaj essay in marathi language

शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी: जय महाराष्ट्र ! फक्त शिवरायांच्या आठवणीत. जय भवानी जय शिवाजी ची ललकार आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाते. शिवाजी महाराज यांचा जन्म 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर, शाह जय भोसलेचा पुत्र, जिजाबाई (राजमाता जिजाऊ) येथे झाला. शिवनेरी किल्ला पुणा (पुणे) च्या उत्तरेकडील जुन्नर गावाजवळ आहे. त्यांचे बालपण राजा राम, संन्यासी आणि रामायण, महाभारत या कथासंग्रहांत आणि सत्संगात घालवले गेले. ते सर्व कलांचा स्वामी होते, त्यांनी त्यांच्या बालपणामध्ये राजकारण आणि युद्धाचा अभ्यास केला. यावर्षी महान मराठा ज्यांची 391वी जयंती आहे| Chatrapati Shivaji Maharaj ki Jai ho! शिवाजी जयंती के अवसर पर आप Shivaji Jayanti Status भी देख सकते हैं|

छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे राजे होऊन गेले. त्यांच्या पित्याचे नाव शहाजीराजे भोसले आणि मातेचे नाव जिजाबाई असे होते. शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाकडे नोकरीस होते. परंतु जिजाबाईंना मात्र वाटत होते की आपले स्वतंत्र राज्य असायला हवे. आपण दुस-याची चाकरी करता कामा नये. म्हणून त्यांनी लहानपणापासूनच शिवाजीला राम, कृष्ण आदि थोर, महान पुरूषांच्या कथा सांगितल्या.

दादोजी कोंडदेव ह्या गुरूंनी शिवाजीला युद्धकलेचे, दांडपट्टा चालवण्याचे, तलवारबाजीचे आणि घोड्यावर बसण्याचे शिक्षण दिले. त्यांच्या मनात स्वराज्य हवे अशी स्वप्ने पेरली. म्हणूनच शिवाजीमहाराज स्वातंत्र्याच्या विचाराने पेटून उठले.

मोठेपणी त्यांनी स्वतःचे राज्य उभारले. मोगलांना, आदिलशहाला, निजामाला पार सळो की पळो करून सोडले. मोगल बादशहा औरंगजेब ह्याला शेवटपर्यंत शिवाजीला पकडता आले नाही.

त्यांनी १६७४ साली रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या राज्यात रायगड, सिंहगड, राजगड, प्रतापगड, सिंधूदुर्ग, पन्हाळा, राजमाची असे मोठमोठे किल्ले होते. शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्व खूप जाणलेले होते म्हणूनच ते जंजियाच्या सिद्दीशी लढू शकले.

अशा ह्या शिवाजी महाराजांचे १९८० साली वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी निधन झाले.

शिवाजी महाराज निबंध मराठी pdf – janta raja shivaji maharaj essay in marathi

महाराष्ट्रातीलच नव्हे तर उभ्या भारतातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरोखर असा लोकोत्तर पुरूष युगायुगातून क्वचितच जन्माला येतो.

आज शिवाजी महाराजांना जाऊन साडेतीनशे वर्षांचा काळ लोटलेला असला तरी ह्या मराठी राज्याच्या संस्थापकाला कुणी विसरू शकलेले नाही.

त्यांचा जन्म १६२७ किंवा १६३० ह्या साली पुण्याजवळच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे पिता शहाजी राजे हे प्रथम निजामाच्या आणि नंतर आदिलशहाच्या दरबारातले सरदार होते. त्यांची आई जिजाबाई अत्यंत कर्तृत्ववान आणि खंबीर स्त्री होती. त्यांनी शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्वप्न पेरले. दादोजी कोंडदेव ह्या महान गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी शिक्षण घेतले. त्या शिक्षणात सैनिकी शिक्षणही होते.

लहान वयातच त्यांना आणि जिजाबाईंना पुण्याची जहागीरदारी देऊन शहाजींनी पुणे येथे पाठवले. त्या काळात पुणे उजाड आणि निर्जन होते. जिजाबाईंनी ते पुन्हा वसवण्यासाठी शिवबांना उत्तेजन दिले.

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजीने आपल्या मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. त्यानंतर काही काळातच त्याने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.

शिवाजीराजांच्या पूर्वीही बरेच राजे होऊन गेले आणि त्यांच्यानंतरही बरेच राजे झाले. असे असताना शिवाजी महाराजांचे नाव अजूनही का घेतले जाते? त्यामागचे कारण हेच आहे की त्यांचे राज्य हे जनतेला आपले राज्य आहे असे वाटत होते. शिवाजीने जनतेच्या प्रश्नांना महत्व दिले. लोकांवर अन्याय करणा-यांची कधीही गय केली नाही. मग तो कितीही मोठा तालेवार असो. अक्षरशः शून्यातून त्यांनी राज्यनिर्मिती केली. अत्याचारी यवनी सत्तेविरूद्ध उभे राहाण्याची हिंमत लोकांमध्ये निर्माण केली. ते शूरवीर होतेच परंतु प्रसंगावधानी पण होते. अफजलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाचा पराभव ह्या प्रसंगातून ते दिसून येते. त्यांनी पार दिल्लीच्या औरंगजेबाचीसुद्धा झोप उडवली होती. आग्र्याहून सुटका ह्या ऐतिहासिक घटनेतून त्याची साक्ष मिळते.

राजांपाशी गुणग्राहकता होती, त्यांच्या मनात अन्यधर्मीयांबद्दल द्वेष नव्हता. कित्येक मुसलमान सैनिक आणि अधिकारी त्यांच्या सैन्यात होते. स्त्रियांविषयी त्यांच्या मनात पराकोटीचा आदर होता म्हणूनच कल्याणचा खजिना ताब्यात घेतला तेव्हा मुसलमान सुभेदाराच्या सुनेला त्यांनी साडीचोळी देऊन परत पाठवले.

५ जून १६७४ रोजी शिवरायांनी रायगडावर राज्यारोहण केले. स्वतःच्या नावाचे नाणे विनिमयासाठी निर्माण केले. त्यांच्या स्वराज्यात एकुण तीनशे गड आणि किल्ले होते. लढाईच्या धामधुमीत गरीब जनतेला त्रास होऊ नये म्हणून राजे किती दक्ष होते हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांतून दिसून येते.

अशा ह्या न्यायप्रिय, कल्पक, गुणग्राहक, दूरदर्शी, प्रसंगावधानी आणि शूरवीर राजाचा मृत्यू ३ एप्रिल, १६८० रोजी झाला खरा परंतु कीर्तीरूपाने आजही ते आपल्यात आहेतच.

Shivaji Maharaj Nibandh Marathi Madhe

शिवरायांच्या जन्मापूर्वी विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि मुघलशाही यांच्या त्रासाने आणि जुलमी अत्याचाराने सारा महाराष्ट्र होरपळून गेला होता. यवनांच्या त्रासाने लोक हवालदिल झाले होते. त्याचवेळी सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका वीरपुत्राचा जन्म झाला. तो वीरपुत्र म्हणजेच छत्रपती शिवराय!

जिजामाता आणि शहाजीराजे यांच्या पोटी जन्मलेला बालशिवाजी सह्याद्रीच्या कड्या-कपारीत खेळू लागला, बागडू लागला. जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांना राजकारणाचे आणि राज्यकारभाराचे धडे मिळू लागले. रामायण, महाभारतातील गोष्टींतून त्यांचे बालमन संस्कारित होऊ लागले. वयाच्या चौदाव्या वर्षी शिवरायांची फलटणच्या निंबाळकरांची मुलगी सईबाई हिच्याशी विवाह झाला.

इ.स. १६४५ साली लहान वयातच बाजीप्रभू, तानाजी मालुसरे सारख्या निवडक मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांची घोडदौड सुरू झाली. बारा मावळांतील किल्ल्यांमागून किल्ले ताब्यात घेतले. स्वकीयांचा बंदोबस्त करीत परकीयांशी सामना केला. अफजलखान, शाहीस्तेखान, सिद्दी जौहर, मिझ राजे जयसिंग यांच्या रुपाने शिवरायांवर आणि स्वराज्यावर अनेक संकट आली. ती त्यांनी समर्थपणे पेलली.

रयतेच्या सुखासाठी आणि भक्कम स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांनी १६७४ मध्ये राज्याभिषेक करवून घेतला. ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा स्फूर्तिदाता राजा, मातृभक्त-पितृभक्त राजा, साधुसंतांचा आदर करणारा राजा, दूरदृष्टी लाभलेला लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे शिवरायांच्या व्यक्तित्त्वाचे कितीतरी पैलू आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी – Shivaji Maharaj Nibandh Marathi 350 Words

फाल्गुन वद्य तीन शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० वार शुक्रवार रोजी सुर्यास्तानंतर शिवनेरी किल्यावर शिवरायांचा जन्म झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी तर आईचे नाव जिजाऊ असे होते. निजामशाही वाचविण्याच्या प्रयत्नात मोगलपाठीवर असताना गरोदर असलेल्या जिजाऊ साहेबांना शहाजीराजांनी जुन्नरजवळील ‘शिवनेरी किल्यावर ठेवले वे ते पुढे गेले.

बाळ शिवबांच्या जडणघडणीत मासाहेब जिजाऊ याचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनीच बालपणी त्यांना वीर पुरुषांच्या, नैतीकतेच्या गोष्टी शिकवल्या.

शिवाजी राजांची पहिली सहा वर्ष ही शिवनेरी, पेमगिरी व माहुली या किल्ल्यावर व्यतित झाली.

स्वराज्याची संकल्पना शिवरायांनीच प्रथम मांडली. मित्रांची एक जबरदस्त फौज तयार केली. त्यांना आपण मावळे म्हणतो. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच त्यांनी तोराणागड जिंकून घेतला. त्यानंतर रायगड, प्रतापगड आदी किल्यांचा समावेश आहे. तर सिधुदूर्ग, जलदूर्ग, स्वर्णदुर्ग आदी किल्यांचे बांधकाम केले.

लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करणारा राजा अशी त्यांची जगात ओळख आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात आठ मंत्री होते. त्यांना अष्टप्रधान असे म्हणत.

इतर धर्मीयांचा आदर बाळगणे, स्त्रीयांचा सन्मान करणे आणि गरिबांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्ये होते. म्हणूनच आजच्या लोकशाहीत देखील त्यांच्यासारख्या एका लोककल्याणकारी राजाची आठवण केली जाते.

त्यांच्या सैन्यात अनेक जाती-धर्माची आणि जीवाला जीव देणारी माणसं होती. त्यांनी कधीही जातीवादाला थारा दिला नाही उलट अठरा पगड जातीतल्या लोकांना सोबत घेऊनच शिवाजी राजांनी आपले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले.

जाणता राजा शिवाजी महाराज निबंध मराठी

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज  मराठी निबंध बघणार आहोत. साडेतिनशे वर्षाच्‍या गुलामगीरीच्‍या बंधनातुन मुक्‍त करून हिंदवि स्‍वराज्यात सुख आणि शांतीने जगण्‍याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परीश्रम करून जनतेला दिला . अश्‍या या महान योध्‍याला नमन करूया आणी सुरूवात करूया निबंधाला.

सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनताशिवाज जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा खिताब  बहाल केला.

महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशहाच्या, सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त केले.शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण-घडण केली.

सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.

स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता. शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवराय राजकारण धुरंदर, दूरदृष्टीचे होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात होते. सागरात आरमार जय्यत तयारीत होते. अनेक शूर, लढवय्ये, पराक्रमी वीर स्वराज्याच्या शत्रूचा बीमोड केला.

शत्रूचा बीमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात, न्याय मिळत होता. अपराध्यांना शासन होत होते. शेतकऱ्यांची गा-हाणी दूर होत होती.

प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या. स्वराज्याचा विस्तार झाला होता. अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खऱ्या अर्थाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय‘ याचा प्रत्यय आणून दिला होता.

त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख-समाधानाने नांदू लागली.  अनेक मोहीमा काढून शिवरायांनी शत्रूला नामोहरम केले. प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच व्हावे, राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले.

प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले. ते खरे तर आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले.

अखंड परीश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच. तरीही त्याची तमा न बाळगता ते शेवटपर्यंत कार्यरत होते. अखेर इ. स. १६८० मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

शिवाजी महाराज निबंध इन मराठी – chatrapati shivaji maharaj essay in marathi

shivaji maharaj essay in marathi

‘शिवाजी’ या महामंत्रातच महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आहे. या तीन अक्षरात पराक्रम आहे. निष्ठा आहे, शिस्त आहे, जिगर आहे. चिवट, प्रखर, ज्वलंत व रसरशीत राष्ट्रीय अस्मिता आहे. होय ‘शिवाजीमहाराज’ हे शब्द त्यांचं जीवनचरित्र सर्व मराठी माणसाला प्रेरक व स्फुरक आहे. अभिमानानं छाती भरून यावी, मान ताठ व्हावी असं महाराष्ट्राला ललामभूत झालेलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘छत्रपती शिवाजीमहाराज’!

शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।

रामदास स्वामींनी पुढील पिढ्यांना संदेश देताना शिवाजीमहाराजांबद्दल हे गौरवोद्गार काढले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा श्री गणेशा करणाऱ्या शिवाजीमहाराजांचे जीवन अलौकिक आहे.

‘झाले बहू होतील बहू, परंतु या सम हा।’ असे वर्णन ज्यांना तंतोतंत लागू पडते ते म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराज ! आज त्यांना जाऊन ३४० वर्षे झाली. तरीही त्यांच्या कर्तृत्वाचा डंका कालप्रस्तरावर गाजत आहे. यातच त्यांची थोरवी’ आहे.

शहाजी राजे भोसले व जिजाबाई यांच्या पोटी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर या सुपुत्राचा जन्म झाला. महाराष्ट्राला त्याचवेळी स्वराज्याचे स्वप्न पडले अन् जिजाऊच्या शिवबाने उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात मातेचे, जनतेचे आणि राष्ट्राचे स्वप्न पूर्ण केले.

शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात निजामशाही, आदिलशाही यांचे राज्य होते. ते राजे श्रीमंत असले तरी मनाने उदार नव्हते. रयत सुखी नव्हती. रयतेला खायला पोटभर अन्न नव्हते. रहायला सुरक्षित निवारा नव्हता. आयाबायांची अब्रू सुरक्षित नव्हती. सगळीकडे अन्याय माजला होता. अशा परिस्थितीला त्रासलेल्या जिजाऊने काही निश्चय केला आणि बाळ शिवाजीला घडविण्याचा पवित्रा घेतला. त्या शिवबांना जवळ घेत. रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. साधू संतांच्या गोष्टी सांगत. यामुळे पराक्रम आणि आदर बुद्धी, स्वाभिमान आणि दयाळूपणा यांचे बाळकडू पीत शिवराय मोठे झाले.

गरीब मावळ्यांच्या मुलांबरोबर ते खेळू लागले. माणसांची पारख करू लागले. यातूनच त्यांना जिवाला जीव देणारे, सवंगडी लाभले. नानाजी, बाजी, येसाजी, हिरोजी, बहिर्जी किती नावे सांगावीत?

स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना किती मेहनत करावी लागली! किती अग्निदिव्य करावे लागले! किती मोहरे इरेला घालावे लागले ! धन्य ते शिवबा, धन्य ती जिजामाता आणि धन्य ते जीवावर उदार होऊन स्वराज्यासाठी स्वप्राणाचे बलिदान करणारे मावळे !

वडिलांकडून शिवरायाला लहानशी जहागीर मिळाली होती परंतु त्यांनी मराठा तेतुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा हे ब्रीद अंगीकारले. लोकांची संघटना तयार केली. स्वकीय व परकीय बलाढ्य शत्रूचा पराभव केला व स्वराज्य निर्माण केले. अशक्य होते ते शक्य करून दाखवले. शून्यातून स्वराज्य निर्माण केले. म्हणून म्हणावे वाटते,

कीर्तिवंत, नीतिवंत हे शूरांच्या वीरा ।
तुला हा मानाचा मुजरा, तुला हा मानाचा मुजरा ।

शिवरायांची आपल्या सेवकांवर खूप माया होती. ‘गड आला पण माझा सिंह गेला म्हणून तानाजीच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले. आग्याच्या कैदेत जीवावर उदार होणाऱ्या मदारी मेहतरला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. शिवरायांनी जातिभेद, धर्मभेद, कधी पाळलाच नाही. प्रतापगडच्या युद्धातील कपटी डाव खानाच्या अंगावर उलटविणाऱ्या शिवाजीराजांना जनतेची फार काळजी वाटे. त्यांच्या सुखासाठी त्यांनी खूप कार्य केले. .

‘परस्त्री मातेसमान’ मानणाऱ्या शिवबांनी ‘स्त्री’चा बहुमान केला.

जातिधर्म हा मुळी न येथे स्त्रीच असे देवता
राजप्रतिष्ठेहुनी मानतो स्त्रीची मी योग्यता
हवे तुम्हाला स्वराज्य जर हे पुरते ध्यानी धरा

स्त्री जातीला प्रथम करावा मानाचा मुजरा ! अशी त्यांची वृत्ती होती. कृती होती म्हणूनच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी सन्मानाने परत पाठवले अन् हिरकणीच्या नावानं रायगडावर बुरुज बांधला.

आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी गनिमी काव्याने अनेक गडकिल्ले घेतले. आत्मविश्वास व मुत्सद्देगिरीच्या जोरावर स्वराज्य उभारले. दिलदारवृत्ती व दूरदृष्टी या गुणांच्या जोरावर बलाढ्य शत्रूशी टक्कर दिली. स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी आयुष्यभर झटले व हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले. जनताभिमुख राज्यकारभार करणारा हा जाणता राजा. श्रीमान योगी राजा होता. स्फूर्तीचा झरा आहे, राहील.

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी – Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh

शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती: साथ ही संभाजी महाराज कविता आप भी देख सकते हैं|

स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शहाजीराजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते.

शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते. बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली. कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते.

माता जिजाऊ रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत. त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले. शहाजीराजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत.

शिवरायांचे लग्न किशोर वयातच झाले होते. जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई हिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले. शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचा रयतेवर होणारा छळ अनुभवात येत होता. त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली.

आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला. त्यांनतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले.

“अफजलखान वध”, “शायीस्ते खानाची बोटे कापणे” या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका, या बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.

शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने! प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले.

इ. स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या.

शिवाजीराजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते. तसेच स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजी राजे सफल झाले होते. आता परकीय सत्तांनी शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तुत्वाने आणि पराक्रमाने “छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेला आहे.

कर्तव्यदक्ष छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी – Essay in Marathi 500 Words

शिवाजी महाराज पूर्ण नाव : शिवाजी शहाजी भोसले. जन्म : १९ फेब्रुवारी १६३०.

शिवनेरी किल्ल्यात शिवाजी राजांचा जन्म झाला. त्याच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते.

शिवाजी महाराज बालपण : शिवरायांची पहिली सहा वर्षेफार धावपळीत गेली. त्यांची आई त्यांना राम, कृष्ण, भीम, अभिमन्यू या शूरवीरांच्या कथा सांगे; तर कधी ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवत असे. शिवराय मावळ्यांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत. जिजाबाई व शिवराय यांना शहाजीराजांनी बंगळूरास नेले. तिथे शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे याचे शिक्षण घेऊन ते तरबेज झाले. पुण्याला आल्यानंतर दादाजींनी त्यांना घोडदौड, तिरंदाजी, कुस्ती खेळणे तसेच लोकांना आपलेसे करणे, न्याय देणे, या गोष्टीही शिकविल्या. वयांच्या चौदाव्या वर्षी फलटणच्या नाईक-निंबाळकरांची कन्या सईबाई हिच्याशी त्यांचा विवाह लाल महालात संपन्न झाला.

शिवाजी महाराज कार्य : १६४५ मध्ये त्यांनी आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ वाहिली. शिवरायांनी स्वतंत्र राजमुद्रा संस्कृत भाषेत करून घेतली. ती राजमुद्रा अशी होती.

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।

किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य । ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य । या विचारांनी त्यांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधावयाचे, असे ठरविले. नंतर त्यांनी तोरणा किल्ल्यास प्रचंडगड असे नाव दिले.

शिवरायांचा बंदोबस्तासाठी आदिलशहाने अफजलखानाला पाठविले. अफझलखान कपटी आहे हे शिवराय जाणून होते. त्यासाठी लढाई न करता प्रत्यक्ष भेट करण्याचे ठरविले व त्या भेटीत त्यांनी अफजलखानाचा वध केला. या वधामुळे चिडून आदिलशहाने सिद्दी जौहरला शिवरायांशी लढण्यास पाठविले. त्याने राजांना पन्हाळगडात कोंडले; परंतु छत्रपती शिवराय तेथूनही निसटले. या कामी त्यांना बाजीप्रभू देशपांडे यांनी मदत केली. त्यानंतर लाल महालात कपटाने आलेल्या शायिस्तेखानाची बोटे कापून त्याची फजिती केली; तो दिवस होता, ५ एप्रिल १६६३. पुरंदरच्या तहानंतर ते औरंगजेबास भेटण्यासाठी आगऱ्याला गेले. परंतु बादशहाने त्यांना नजरकैद केले. तेव्हा राजे युक्तीने पेटाऱ्यातून १६६६ मध्ये पसार झाले.

मुघलांच्या ताब्यातील कोंढाणा हा मजबूत किल्ला स्वराज्यात असावा, असे जिजाबाईंसह शिवरायांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी तानाजी मालुसरेंना पाठविले; परंतु लढता लढता तानाजी मरण पावले. तेव्हा शिवराय म्हणाले, ‘गड आला, पण सिंह गेला’ म्हणून त्या किल्ल्याला सिंहगड हे नाव दिले व नंतर तानाजीच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले.

स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे म्हणून त्यांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले. काशीपंडित गागाभट्ट यांनी पौरोहित्य केले. शिवरायांचा राज्याभिषेक १६७४ मध्ये झाला. त्यांनी आपल्या प्रजेवर मातेसारखी माया केली. साधुसंत, मातापिता या सर्वांचा आदर केला. फितुरांना कडक शासन केले. ‘सजन्नांना राखावे, दुर्जनांना ठेचावे’ हा शिवरायांचा बाणा होता. ते सर्व धर्मांचा आदर करत. शिवरायांचे रूप : आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे त्यांच्या गुणांचे पैलू आहेत. अशा या महान राजाला शतश: प्रणाम!

About the author

admin