kavita

नवीन वर्ष कविता 2022 – New Year Marathi Kavita with Images

नवीन वर्ष 2022 : 2020 वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष 2022 मोठ्या आशा आणि संभाव्यतेसह येत आहे. तर आपल्या प्रियजनांना एक उत्कृष्ट आणि यशस्वी वर्ष शुभेच्छा देण्यासाठी यापेक्षा चांगला वेळ कोणता आहे. आपण आपल्या मित्रांसह आणि कुटूंबियांसह नवीन वर्ष साजरा करू शकता किंवा ते लांब असल्यास आपण त्यांना मराठी भाषेत नवीन वर्षाच्या शुभेच्छा कविता पाठवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. ही तुमच्याकडून खूप मोठी इच्छा असेल कारण कविता म्हणजे तुमच्या प्रियजनांना तुमची मनोहर इच्छा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. म्हणून एक विचारसरणीची आणि सुंदर कविता आपले मित्र आणि कुटुंबीयांना आनंदित करेल. तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा कविता मराठीला पाठवून हार्दिक शुभेच्छा.

Navin Varsh Marathi Kavita

आम्ही या लेखामध्ये आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 चा संदेश देत आहोत, जो आपण आपल्या सोशल मीडियावर सामायिक करू शकता आणि आपल्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. इंग्रजी कॅलेंडरमध्ये, नवीन वर्ष प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण नवीन दिवस नवीन दिवस सुरू करतो. जगात अशी अनेक प्रकारची कॅलेंडर्स आहेत जी देश व धर्मांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, आपल्या हिंदुस्थानातील हिंदु दिनदर्शिकेमध्ये, नवरात्र म्हणजे चैत्र शुक्लाच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. मुस्लिम कॅलेंडरमध्ये पहिला दिवस म्हणजे मोहर्रम. म्हणूनच वेगवेगळ्या देशांमध्ये आणि धर्मात वेगवेगळ्या प्रकारचे कॅलेंडर आहेत परंतु संपूर्ण जगात 1 जानेवारीला नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते. new year marathi kavita, म्हणून ग्रीटिंग्ज, शायरी, स्टेटस, शुभेच्छा, कार्डे, कोट, संदेश येथून पहा आणि तुमच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा.


नवीन वर्ष
कॅलेंडर बदललं कि वाटतं, आयुष्यही नवं झालं
रोजच्या जगण्यातला तोचतोचपणा, जरासा विरतो झालं!
मागल्या वर्षी राहून गेलेलं, यंदाच्या वर्षी घडेलंसं वाटतं
मागचे हिशोब चुकते करताना मात्र.. मन जरासं काहुरतं
नव्या वर्षात नवी स्वप्नं पडतात
कधी पूर्वीचीच स्वप्नं नव्याने येतात
आस मनाला लावतात, पुन्हा नवे धुमारे फुटतात
जणू पहिल्या पावसात झाडं, नव्या पालवीने बहरतात
नवे पक्षी सोबतीला येतात, येताना जुन्याही आठवणी आणतात
मनाला चिंब चिंब भिजवतात, मग फुलपाखरं रुंजी घालतात
नव्या दिवसाची नवी पहाट, आशेच्या हाती देते हात
तांबड्या क्षितिजावर अल्लद,...सूर्यही घेतो नवा आकार
नवेच किरण, नवेच आकाश,
नव्या वर्षाचाच सारा थाटमाट
नवेनवेसे दिवस असे कितीसे असतात
वर्षे अशीच पाठ फिरवून सरतात
पण तरीही दरवर्षीच, कॅलेंडर बदललं कि वाटतं
आयुष्यही नवं झालं!
Copy Tweet
Copied Successfully !

नवीन वर्ष कविता मराठी

यहाँ हमने हर साल 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 व 2018 का poems व kavita का full कलेक्शन इन मराठी (marathi), हिंदी फॉण्ट में दिया है| नवीन वर्षाच्या कविता, new year essay, new year poem in marathi 2022 को आप Hindi, Marathi, maratha, hindi language व hindi Font में जानना चाहे जिसमे की Two Lines Shayari के साथ नवीन वर्षाच्या शुभेच्छा कविताएं मिलती है | Marathi Language व marathi Font का कलेक्शन प्रदान करेंगे जिनको आप facebook, WhatsApp, Twitter, Instagram, पर share कर सकते हैं|

नवीन वर्षाच्या कविता


नेहमीप्रमाणेच येते
31st ची night
काही असतात खुश
तर काही होतात tight
प्रत्येकाचे अंदाज वेगळे
प्रत्येकाचा आनंद निराळा
तरीपण एकच असतो
नववर्षाचा आनंद कोवळा
काहीना 31st म्हणजे
असते full party
enjoy करता करता
जास्त होते ninty
कोणी girlfriend सोबत
कोणी just friend सोबत
उधळवितात रंग असे
जणू लपन्डावी औरत
DJ वर नाचणे म्हणजे
असते एक स्वर्गसुख
गाण्याच्या तालावर
मिळत एक नादसुख
नवे संकल्प करावे अन
सहजच विसरून जावे
नवीन वर्ष येता मग
मागचे संकल्प आठवावे
माहीतच नसत काय करू ?
का उगाच या वादळात मरू..?
वाहणारे असच वाहतात
मग तरनारा मी का मरू…?
काहीही असो
31st चा दिवस म्हणजे
न संपणारी अविरत night
सहज बाहेर पडत असते
खऱ्या आयुष्याची fight
Copy Tweet
Copied Successfully !

नवीन वर्षाच्या वाटेवर 


जुन्या वर्षाचे दुःख सारे घेउन कडेवर
जात आहे मी नवीन वर्षाच्या वाटेवर ! !
नवीन वर्षात असती नवीन आशा
पदरात पड़ते मात्र दरवर्षी निराशा !
फास्टच फास्ट धावे ही महागाईची ट्रेन
उपाय नसे काही म्हणून सळसळे माझ ब्रेन !
तरंगत असतो दरवर्षी दुखाच्या लाटेवर !
जात आहे मी नवीन वर्षाच्या वाटेवर ! !
थर्टी फर्स्ट च्या पार्टीसाठी ना देत कुणी होकार
माझ्या सारखेच असती सारे ना पूरे कुणा पगार !
नवीन वर्षात असे नवीन काय दिसणार
तिच माणसे,तिच बायको,तेच काम असणार !
जुनीच खाट मात्र झोपनार नवीन वर्षाच्या खाटेवर !
जात आहे मी नवीन वर्षाच्या वाटेवर ! !
वाढत्या महागाईने होई दरवर्षी मी वाकडा
नवीन ना बदले काही बदले फक्त शेवटचा आकडा !
या वर्षीही काही नाही होणार,सांगतो ऐक माकडा
कारण! आहे माझ्याकडे 2020 चा दाखला !
नको बसू पून्हा नवीन वर्षाच्या आशेवर !
तरीही जात आहे मी नवीन वर्षाच्या वाटेवर ! !
मनापासून प्रार्थना माझी
व्हावी 2022 ला पूर्ण तुमची ईच्छा !
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वा
मनापासून हार्दिक शुभेच्छा ! !
Copy Tweet
Copied Successfully !

नवीन वर्ष कविता 2022


नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....!
नव्या वर्षात पाऊलं पडे
वाजती सनई चौघडे
सरले गत वर्ष जरी रडे
या वर्षाला नमन माझे
आनंदाचे तोरण साजे
मिळो सारे ताजे ताजे
नवी साडी नवी वाडी
नवी गाडी नवा बांगला
नवा रंगू दे डाव चांगला
नवी जागा नवे शिवार
चहू बाजूने हिरवेगार
लाभो सर्वां सुखी शेजार
खाणे पिणे मौज मजा
तू राणी मी राजा
नको काही गाजा वाजा
शांत सारे सुखी जीवन
सारे कसे पतित पावन
रोज मिळो सर्वा श्रावण
देवा नको वाटू दे कोणा हेवा
येऊदे घरात खुली हवा
खाऊ घाल आम्हा रोज मेवा
प्रार्थना तुला आगाऊ अशी
शिंकू नये रे कोठे माशी
राहतोस ना तू सदा उराशी ...!
एवढेच मागणे तुझे पायीं
मला नाही कोणती घायी
तूच आमची काळजी व्हायी....!
Copy Tweet
Copied Successfully !

नवीन वर्षाच्या कविता


नववर्षाच्या नव्या कल्पना
घेऊन आले वर्ष नवे
करुया साकार स्वप्न आपुले
आपल्या जे हवे हवे
तरुणाईचे दिवस असती
फुलायचे हसायचे
संगणकाचे घेऊन शिक्षण
स्वप्न आपुले फुलवायचे
महागाईवरती करू मात
नाही नुसते रडायचे
कष्ट करुनी दिवस सजवुया
नाही मागे हटायचे
दीनदुबळ्यांची करुया सेवा
जन्मदात्यांचा ठेवू मान
चुकले असेल मागे काही
नाही आता चुकायचे
आपुले नशीब आपल्या हाती
देह झिजवुया देशासाठी
देशासाठी जन्म आपला
देशासाठीच मरायचे
नागरिक आम्ही नव्या युगाचे
भारतीय संस्कृती आपली शान
श्रद्धा,शांतीची मशाल घेऊन
देऊ सर्वाना जीवनदान
साक्षरतेचे धडे गिरवूया
नाही अडाणी राहायचे
भारत माझी मातृभूमी
मानाने हे सांगायचे
शिक्षणातून फुलते जीवन
सर्वांनाच पटवून द्यायचे
विचार करुनी उचला पाऊल
नाही दबावात जगायचे
Copy Tweet
Copied Successfully !

New Year Poem In Marathi


Latest New Year Poem In Marathi
ईतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो
तरीही त्यावर असतो
नव्या नवतीचा तजेला
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी
म्हणूनच ईतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ
नव्या स्वप्नांचा प्रारंभ
Copy Tweet
Copied Successfully !

गए साल की
ठिठकी ठिठकी ठिठुरन
नए साल के
नए सूर्य ने तोड़ी।
देश-काल पर,
धूप-चढ़ गई,
हवा गरम हो फैली,
पौरुष के पेड़ों के पत्ते
चेतन चमके।
दर्पण-देही
दसों दिशाएँ
रंग-रूप की
दुनिया बिम्बित करतीं,
मानव-मन में
ज्योति-तरंगे उठतीं।
Copy Tweet
Copied Successfully !

नवीन वर्षाचा कविता


Best New Year Poem In Marathi
प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
Copy Tweet
Copied Successfully !