Marathi Language Day Essay – Marathi Bhasha Din Bhashan in Marathi Pdf Download

Marathi bhasha din speech

Marathi bhasha din 2020: मुख्य रूप से महाराष्ट्र राज्य में मनाया जाता है, यह कर्नाटक और मध्य प्रदेश के कुछ हिस्सों में भी मनाया जाता है। यह प्रख्यात मराठी कवि विष्णु वामन शिरवाडकर की जयंती मनाने के लिए चिह्नित है, जिन्हें कुसुमाग्रज के नाम से अधिक जाना जाता था। 27 फरवरी को मराठी भाषा दिवस के रूप में मनाया जाता है और यह महाराष्ट्र और गोवा के राज्यों में बहुत महत्वपूर्ण दिनों में से एक है। इसे मराठी भाषा दिवस या मराठी भाषा दिवस भी कहा जाता है।

Marathi language day speech in marathi

27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन म्हणून उत्सव साजरा केला जातो आणि महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत उल्लेख केलेला हा महत्त्वाचा दिवस आहे. विख्यात मराठी कवी विष्णु वामन शिरवाडकर यांच्या जयंतीच्या जयंतीचे चिन्ह म्हणून ओळखले जाते, जे कुसुमाग्रज म्हणून लोकप्रिय होते. याला मराठी भाषा दिवा किंवा मराठी भाषा दिवस असेही म्हणतात. मुख्यत्वे महाराष्ट्राच्या राज्यात साजरा केला जातो, तो कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील काही भागांत साजरा केला जातो. मराठी बोलणार्या समाजासाठी, समृद्ध संस्कृती आणि त्यांच्या भाषेच्या सौंदर्याचे गर्वाने गौरव करण्याचा दिवस आहे.

विष्णु वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणूनही ओळखले जाते 27 फेब्रुवारी 1 9 12 रोजी त्यांचा जन्म झाला. ते एक प्रसिद्ध मराठी कवी, नाटककार, उपन्यासकार आणि लघु कथा लेखक होते, त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितपणाचे स्वातंत्र्य यावर भरपूर लिहिले. त्यांचे साहित्य भारतीय साहित्य उत्कृष्ट कृती समजले जाते. नाटसम्राट हे मराठी साहित्यातील प्रसिद्ध प्रख्यात लोकांपैकी एक आहे. 1 99 1 मध्ये त्यांनी पद्मभूषण समवेत अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारदेखील घेतले आहेत. मराठी साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे कार्य खूप महत्वाचे होते आणि त्यांचे कार्य सन्मान करण्यासाठी दरवर्षी त्यांचे जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून चिन्हांकित होते.

मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी 2016 मध्ये सरकारने दोन पुरस्कारांचे शुभारंभ केले. महाराष्ट्रात महाराष्ट्र ही अधिकृत भाषा आहे. हिंदी, बंगाली आणि तेलगू नंतर ती चौथी सर्वात मोठी बोलीभाषा आहे. जगातील सर्वात बोलीभाषा असलेल्या यादीत यादी 1 9 व्या स्थानावर आहे.

हा दिवस साजरा करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. शाळांमध्ये भाषेचे महत्त्व दर्शविण्यासाठी निबंध व भाषण स्पर्धा आयोजित केली जातात. इतर काही संस्था किंवा निवासी संस्था देखील लोकांमध्ये मराठीचे महत्त्व वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात.

मराठी भाषा दिवस भाषण

ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी १९१२ मध्ये झाला होता. कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातही मुक्त विहार केला. वयाच्या १७व्या वर्षापासून ‘बालबोधमेवा’ या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली. १९४२मध्ये प्रसिद्ध झालेला ‘विशाखा’ हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे.

कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचं प्रेमगीत या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.
‘नटसम्राट’ या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तर १९८८मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते.

सामाजिक अन्याय, विषमता यावर कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला. केवळ लिखाण करुन ते थांबले नाही तर चळवळींमध्येसुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यामुळे एका अर्थाने कुसुमाग्रज सामाजिक चळवळीचे ते प्रणेते होते.

Jagtik marathi rajbhasha din nibandh

Marathi bhasha din essay

२७ तारखेला मातृभाषा दिन साजरा केला जाईल.. एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का? किंवा करायला हवेत तर कोणते? सांगतोय स्वरूप पंडित
भारतात ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ अर्थात किमान समान कार्यक्रम ही संकल्पना सर्वपरिचित आहे. सरकार कोणतीही योजना आखत असते वेळी एक दिशादशर्क म्हणून या संकल्पनेचा उपयोग होतो. आर्थिकदृष्टय़ा मागास, शोषित-वंचित अशा घटकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळावे अशी या कार्यक्रमामागील भूमिका असते. पण आपलेच संवेदनशून्य होत जाणारे मन सध्या हे जणू विसरत चालले आहे की, आपली भाषा- आपली मातृभाषा हीसुद्धा जागतिक भाषेच्या रेटय़ासमोर- प्रसारमाध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून वंचित होते आहे. आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत. एकीकडे इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाहीच; किंबहुना त्याचे ज्ञानही मिळवायचे हे आव्हान आहेच.. त्याचबरोबरीने आपली भाषा समृद्ध करायची, तिचा वापर-प्रसार करायचा आणि तिचे चिरंतनत्व अबाधित राखायचे हेसुद्धा मोठे आव्हान आहे.
मला याच पाश्र्वभूमीवर महात्मा गांधीजी आठवतात. सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल तत्कालीन भारतीय जनतेच्या मनात आदर होताच, पण त्या तुलनेत महात्मा गांधीजींबद्दल मनात असलेला आदर सक्रिय सहभागातून व्यक्तही होत होता. यामागील रहस्य कोणते असावे? तर उत्तर सोपे आहे. गांधीजींनी देशभक्तीची व्याख्या सोप्या सोप्या आणि सर्वाना सहज जमू शकतील अशा लहान लहान कृतींनी मांडली. त्यात चरख्यावरील सूतकताईचा समावेश होता, त्यात गोशाळा चालविणे होते, त्यात खादीचा वापर होता, प्रभात फेऱ्या काढणे होते, वंदे मातरम् म्हणणे होते.. अशा अनेक लहान लहान कृतींतून सामान्य माणसाला आपण देशासाठी काहीतरी करत असल्याची अभिमानास्पद जाणीव करून दिली जात होती. तत्कालीन बलाढय़ ब्रिटनच्या आव्हानासमोर गांधीजींच्या या कृती कार्यक्रमाने प्रतिआव्हान निर्माण केले.
मला आज हे आठवले. कारण आपणही आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना विनम्रतापूर्वक आणि अन्य भाषांचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही का करू शकणार? आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोटय़ा छोटय़ा कृतींनी काहीच नाही का करू शकणार? भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार? भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार? मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच ‘अल्प योगदान’ दिल्याचे समाधान लाभू शकेल. हा ‘किमान भाषा वापर’ असा कार्यक्रम नसून उलट किमान समान कार्यक्रमाच्या धर्तीवर आणि महात्मा गांधीजींनी घालून दिलेल्या आदर्शांवर आधारित ‘भाषा संवर्धन आणि प्रसार कार्यक्रम’ आहे. काय आहेत या कृती?
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज किमान १० तरी ‘फोन कॉल’ हाताळतोच. दहाही वेळा आपण संभाषणाची सुरु वात ‘हॅलो..!’ अशी करतो. आपण आपल्या मातृभाषेतून ही सुरुवात केली तर? म्हणजेच ‘नमस्कार!’ या शब्दाने आपण संवादास सुरु वात केली तर? त्यामुळे आपल्या भाषेबद्दलचे प्रेमही व्यक्त होईल शिवाय एखादी अनोळखी व्यक्ती, जी आपल्याशी थेट हिंदी अथवा इंग्रजीतून संवाद साधण्यास सुरुवात करते मात्र तिचीही मातृभाषा मराठीच असते अशी अधिक जवळकीने-मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे नेमक्या अभिव्यक्तीद्वारे आपल्याशी संवाद साधू शकेल.
आपण आपल्या ‘मोबाइल’वरून किमान १०-१५ तरी लघुसंदेश (एसएमएस) दररोज पाठवतो. ते सगळेच अर्थातच इंग्रजीतून असतात किंवा इंग्रजी लिपी आणि मराठी शब्द अशा पद्धतीने असतात. आपण दिवसभरात किमान दोन लघुसंदेश मराठीतून पाठवले तर? पुन्हा एकदा भाषेवरील प्रेमाबरोबरच माहिती तंत्रज्ञानात मातृभाषेचा केला जाणारा वापर आपल्याबरोबरच समोरच्यालाही समाधान देऊ शकेल. शिवाय आज कित्येकदा घरकाम करणाऱ्या व्यक्ती इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे मोबाइलचा परिपूर्ण वापर करीत नाहीत. अशांना मराठीतील लघुसंदेश पाठविले गेल्यास त्यांना आपण मूळ प्रवाहात आल्यासारखे वाटेल.
ल्ल जी बाब एसएमएसची तीच ई-मेलचीसुद्धा! आपल्याला सध्या सर्वच संकेतस्थळांद्वारे ‘फोनेटिक’ (उच्चारावरून शब्द) पद्धतीने अनेक भाषांत ई-मेल पाठविण्याची सुविधा आहे. ठरवून आपण दिवसभरात किमान एक ई-मेल मराठीतून नक्कीच करू शकतो.
आज आपल्याला सणांच्या सुट्टय़ा हव्याहव्याशा वाटतात. पण भारतीय महिने आणि दिनदर्शिका आपण विसरतो. इतकी की कित्येकदा ‘गुरुपौर्णिमे’च्या तिथीऐवजी आपल्याला ‘वट पौर्णिमे’ची तिथी आठवते. पण चैत्र, वैषाख, ज्येष्ठ.. असे महिने आणि त्या त्या महिन्यांत येणारे सण आपल्याला सांगता येतील का? नवरात्र म्हणजे आश्विन महिना हे किती जणांना माहिती असते? तेव्हा किमान ज्या सणांच्या आपल्याला राष्ट्रीय सुट्टय़ा असतात अशा सणांच्या तरी भारतीय दिनदर्शिकेची आपल्याला माहिती हवी आणि ते त्याच तिथीनुसार बोलता यायला हवेत.
आपण हल्ली सामान्यपणे महिन्याला किमान एकतरी चित्रपट पाहतोच.. मग तो कितीही ‘टुक्कार’ का असेना! अशा वेळी आपण आपल्या भाषेसाठीसुद्धा चित्रपट प्रेमातून काही करू शकत असू तर? वर्षांतून किमान दोन मराठी चित्रपट आणि दोन मराठी नाटके आपण नाही का पाहू शकणार? किंवा अगदी मित्र-मैत्रिणींसह जाऊन आपण नाही का मातृभाषेतील कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकणार?
आपण हल्ली सर्रास पुस्तके वाचतोच. अशा वेळी ठरवून वर्षांकाठी किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचणे ही कृतीसुद्धा अशीच सहज जमणारी आणि भाषेसाठी काही केल्याचा आनंद देणारी ठरू शकेल. त्यापुढे जाऊन वाचकांचा एखादा गट तयार केल्यास मराठी पुस्तक खरेदीवर काही विशेष सवलत मिळू शकेल का ते पाहता येऊ शकेल.
वाढदिवसाला, शुभकार्याला, अभिनंदन करताना भेटवस्तू देण्याची प्रथा आता चांगलीच रुजली आहे. अशा वेळी ही भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके/ काव्यसंग्रह/ नाटय़कृती यांचा आपण विचार करायला हवा. एक म्हणजे त्यासाठी आपण स्वत: ती कलाकृती वाचलेली असेल म्हणजे आपोआप वाचक म्हणून आपले भाषेसाठी योगदान होईल आणि शिवाय इतरांना ती वाचायला दिल्याने भाषाप्रसारास- भाषेतील पुस्तक विक्रीस चालना देता येईल.
आता मात्र थोडी अवघड कृती सुचवितो आहे. आपण राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हे पाहिले असेल की तिथे दररोज एक नवीन बँकेच्या पारिभाषिक सूचीतील हिंदी शब्द लिहिलेला असतो. अपेक्षा ही असते की त्यातून प्रादेशिक शब्दांच्या वापरास चालना मिळावी. तद्वतच आपणही मराठीतील दररोज किमान एक तरी नवीन शब्द त्याच्या सर्व छटांसहित नव्याने समजून घेतला पाहिजे. यामुळे कालबाह्य़ होणाऱ्या कित्येक शब्दांना (म्हणजे प्रत्येकी किमान ३६५ प्रतिवर्षी) प्रवाहात आणता येईल.
आणि आता शेवटचे तीन :
बँका, विमा कंपन्या, चल ध्वनी कंपन्या यांच्याकडे मराठीतून माहिती- सूचना पुस्तिका- प्रपत्रे (फॉम्र्स) इत्यादी देण्याचा आग्रह करणे.
आपली स्वाक्षरी शक्य असल्यास मराठीतून करणे.
आणि हा भाषा प्रसार कार्यक्रम प्रतिमहिना किमान ५ जणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे.
आजची तरुण पिढी, त्यांची ‘सेलिब्रेट’ करण्याची वृत्ती, त्यांचे माहिती-तंत्रज्ञानावरील प्रेम, करमणूकप्रधान समाजरचना, दिन-विशेष असे बिंदू लक्षात घेऊन हा कार्यक्रम मी तयार केला आहे. त्यात जेवढी भर घालता येईल अर्थात जेवढी कृतिशील भर घालता येईल तेवढे उत्तमच!
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत..!

Marathi bhasha din essay

ऊपर हमने आपको marathi bhasha din information in marathi, din kavita, marathi diwas celebration in school in मराठी, report writing on marathi day celebration in school, diwas quotes, marathi bhasha din song, आदि की जानकारी दी है जिसे आप किसी भी भाषा जैसे Hindi, Urdu, उर्दू, English, sanskrit, Tamil, Telugu, Marathi, Punjabi, Gujarati, Malayalam, Nepali, Kannada के Language Font , 100 words, 150 words, 200 words, 400 words, 500 words में साल 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 का full collection whatsapp, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं |

मला याच पाश्र्वभूमीवर महात्मा गांधीजी आठवतात. सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल तत्कालीन भारतीय जनतेच्या मनात आदर होताच, पण त्या तुलनेत महात्मा गांधीजींबद्दल मनात असलेला आदर सक्रिय सहभागातून व्यक्तही होत होता. यामागील रहस्य कोणते असावे? तर उत्तर सोपे आहे. गांधीजींनी देशभक्तीची व्याख्या सोप्या सोप्या आणि सर्वाना सहज जमू शकतील अशा लहान लहान कृतींनी मांडली. त्यात चरख्यावरील सूतकताईचा समावेश होता, त्यात गोशाळा चालविणे होते, त्यात खादीचा वापर होता, प्रभात फेऱ्या काढणे होते, वंदे मातरम् म्हणणे होते.. अशा अनेक लहान लहान कृतींतून सामान्य माणसाला आपण देशासाठी काहीतरी करत असल्याची अभिमानास्पद जाणीव करून दिली जात होती. तत्कालीन बलाढय़ ब्रिटनच्या आव्हानासमोर गांधीजींच्या या कृती कार्यक्रमाने प्रतिआव्हान निर्माण केले.
मला आज हे आठवले. कारण आपणही आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना विनम्रतापूर्वक आणि अन्य भाषांचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही का करू शकणार? आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोटय़ा छोटय़ा कृतींनी काहीच नाही का करू शकणार? भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार? भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार? मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच ‘अल्प योगदान’ दिल्याचे समाधान लाभू शकेल. हा ‘किमान भाषा वापर’ असा कार्यक्रम नसून उलट किमान समान कार्यक्रमाच्या धर्तीवर आणि महात्मा गांधीजींनी घालून दिलेल्या आदर्शांवर आधारित ‘भाषा संवर्धन आणि प्रसार कार्यक्रम’ आहे. काय आहेत या कृती?
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज किमान १० तरी ‘फोन कॉल’ हाताळतोच. दहाही वेळा आपण संभाषणाची सुरु वात ‘हॅलो..!’ अशी करतो. आपण आपल्या मातृभाषेतून ही सुरुवात केली तर? म्हणजेच ‘नमस्कार!’ या शब्दाने आपण संवादास सुरु वात केली तर? त्यामुळे आपल्या भाषेबद्दलचे प्रेमही व्यक्त होईल शिवाय एखादी अनोळखी व्यक्ती, जी आपल्याशी थेट हिंदी अथवा इंग्रजीतून संवाद साधण्यास सुरुवात करते मात्र तिचीही मातृभाषा मराठीच असते अशी अधिक जवळकीने-मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे नेमक्या अभिव्यक्तीद्वारे आपल्याशी संवाद साधू शकेल.

About the author

admin